Maharashtra Rain : महाराष्ट्रात धुव्वाधार… राज्यात कुठं मुसळधार? ‘या’ राज्यांना पावसाचा हवामान खात्याचा अलर्ट

Maharashtra Rain : महाराष्ट्रात धुव्वाधार… राज्यात कुठं मुसळधार? ‘या’ राज्यांना पावसाचा हवामान खात्याचा अलर्ट

| Updated on: Aug 19, 2025 | 9:47 AM

मुंबई आणि उपनगरात मध्यरात्रीपासूनच जोरदार पाऊस सुरू आहे. अंधेरी, विलेपार्ले, गोरेगाव, मालाड, बोरिवली आणि कांदिवली यांसारख्या अनेक भागात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे, ज्यामुळे मुंबईकरांना त्याचा फटका बसला आहे.

मुंबईसह राज्यभरातील विविध जिल्ह्यात मुसळधार पावसानं चांगलंच झोडपून काढलं आहे. गेल्या दोन दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसानं रस्त्यांना नद्या-नाल्यांचे स्वरूप आले आहे. अनेक सखल भागात पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांची चांगलीच दाणादाण उडाली आहे. तर हवामान खात्याकडून मुंबई आणि उपनगराला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे आज मुंबईसह ठाणे, पालघर, नवी मुंबई आणि पनवेल महापालिका यासह पनवेल पालिका विभाग या ठिकाणी शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर यासोबतच शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. तर मुंबई, पालघर, ठाणे, संभाजीनगर, जालना, बीड, अमरावती, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. यासोबतच राज्यभरात मुसळधार पाऊस कोसळत असताना प्रशासनाकडून नागरिकांना आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन करण्यात आलंय.

Published on: Aug 19, 2025 09:33 AM