भगवे उपरणे हवेत फडकवले! ‘पाटील, पाटील’च्या घोषणेने आझाद मैदानात संचारली ऊर्जा!
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील आजाद मैदानावर मराठा समाजासाठी ओबीसी आरक्षणाची मागणी करणारे आंदोलन चौथ्या दिवशीही सुरू आहे. आरक्षणाबाबत निर्णय न झाल्याने जरांगे पाटील यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे. आज सकाळी भगवे उपरणे फडकवण्यात आली आणि "पाटील, पाटील" अशी घोषणाबाजी करण्यात आली. सरकारकडून या प्रश्नावर तोडगा शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे. आज, 1 सप्टेंबर रोजी, या आंदोलनाचा चौथा दिवस आहे. आरक्षणाच्या मागणीवर अद्याप कोणताही निर्णय न झाल्याने संतप्त झालेल्या जरांगे यांनी आजपासून पाणीही न पिण्याचा इशारा दिला आहे. सरकार आणि प्रशासनाकडून या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे.
दुसरीकडे, आझाद मैदानातील जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज सकाळी भगवे उपरणे फडकवण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत आंदोलकांनी एकाच वेळी भगवे उपरणे हवेत फडकवत “पाटील, पाटील” अशी जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे काही काळ आझाद मैदानात विजयी उत्साहाचे आणि एकजुटीचे वातावरण निर्माण झाले.
Published on: Sep 01, 2025 01:35 PM
