Manoj Jarange News : संतोष देशमुखांच्या हत्येनंतर आरोपींनी मुंडेंना फोन केला? जरांगेंचे गंभीर आरोप

Manoj Jarange News : संतोष देशमुखांच्या हत्येनंतर आरोपींनी मुंडेंना फोन केला? जरांगेंचे गंभीर आरोप

| Updated on: Mar 05, 2025 | 6:48 PM

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या चौकशीची मागणी केली आहे. तसंच त्याचा सीडीआर रेकॉर्ड काढण्यात यावा असंही जरांगे यांनी म्हंटलं आहे.

संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि खंडणी प्रकरण झालं तेव्हा आरोपींनी धनंजय मुंडे यांना फोन केला होता, असा गंभीर आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज केला आहे. तसंच वाल्मिक कराड हाच धनंजय मुंडे यांच्यावतीने हे सर्व व्यवसाय बघत होता असंही मनोज जरांगे यांनी म्हंटलं आहे. त्यामुळे सीआयडी आणि एसआयटीने धनंजय मुंडे यांची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. फरार आरोपी कृष्णा आंधळे याला पळून जाण्यात मदत करणारे हे धनंजय मुंडे आहेत. हत्या होण्याआधी आठ दिवस आणि हत्या झाल्या पासून राजीनामा देण्यापर्यंतच्या काळाचा सीडीआर निघणं गरजेचं आहे. त्यातून अनेक गोष्टी समोर येतील असंही जरांगे यांनी म्हंटलं आहे.

Published on: Mar 05, 2025 01:29 PM