Manoj Jarange Patil : दहशतवाद्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत – मनोज जरांगे
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याविषयी बोलताना देश सरकारच्या पाठीशी असल्याचं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी म्हंटलं आहे.
दहशतवाद्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत असं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी म्हंटलं आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याविषयी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. संपूर्ण देश या विषयावर सरकारच्या सोबत असल्याचं देखील जरांगे म्हणाले.
यावेळी बोलताना मनोज जरांगे यांनी म्हंटलं की, जेव्हा देशावर, धर्मावर हल्ला होतो तेव्हा अशा लोकांचा मुलाहिजा का बाळगावा? अशा विचारसरणी असणाऱ्या लोकांना ठेवायलाच नको. आपण म्हणतो आपल्याकडे शस्त्र साठा आहे, वेगवेगळे फेतर विमान आहेत, असं बरच काही आपण सांगतो. मग आपण त्याचा आता वापर करायला हवा, असंही जरांगे यांनी यावेळी बोलताना सरकारला आवाहन केलं.
Published on: May 02, 2025 02:05 PM
