Video : अभिनेता सुशांत शेलारच्या गाडीवर दगडफेक

Video : अभिनेता सुशांत शेलारच्या गाडीवर दगडफेक

| Updated on: May 16, 2022 | 4:54 PM

अभिनेता आणि शिवसेना चित्रपट सेनेचा कार्याध्यक्ष सुशांत शेलारच्या गाडीवर दगडफेक आणि गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. यात सुशांतच्या गाडीचं मोठं नुकसान झालं आहे. गाडीची तोडफोड का आणि कुणी केली याबाबत आपल्याला काहीच माहिती नसल्याचं सुशांतने म्हटलंय. दरम्यान, हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. या प्रकरणी सुशांत ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार […]

अभिनेता आणि शिवसेना चित्रपट सेनेचा कार्याध्यक्ष सुशांत शेलारच्या गाडीवर दगडफेक आणि गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. यात सुशांतच्या गाडीचं मोठं नुकसान झालं आहे. गाडीची तोडफोड का आणि कुणी केली याबाबत आपल्याला काहीच माहिती नसल्याचं सुशांतने म्हटलंय. दरम्यान, हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. या प्रकरणी सुशांत ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहे, तशी माहिती त्याने दिलीय.

Published on: May 16, 2022 04:54 PM