Gopichand Padalkar Video : ‘जयंत पाटील कपटी, मला हरवण्यासाठी खूप प्रयत्न…’, गोपीचंद पडळकरांचा निशाणा

Gopichand Padalkar Video : ‘जयंत पाटील कपटी, मला हरवण्यासाठी खूप प्रयत्न…’, गोपीचंद पडळकरांचा निशाणा

| Updated on: Feb 09, 2025 | 12:30 PM

आम्ही टप्प्यात आणून कार्यक्रम करतो, असं म्हणत गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर खोचक टीका केली. दरम्यान, गोपीचंद पडळकर यांच्या टीकेवर शरद पवार गटाच्या मेहबूब शेख यांच्याकडून पलटवार करण्यात आलाय.

जयंत पाटील हा कपटी माणूस आहे, असं म्हणत भाजप नेते गोपीचंद पडळकरांनी टीकास्त्र डागलंय. जत निवडून न येण्यासाठी जयंत पाटील यांनी खूप प्रयत्न केल्याचा आरोपही गोपीचंद पडळकर यांनी केला. तर आम्ही टप्प्यात आणून कार्यक्रम करतो, असं म्हणत गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर खोचक टीका केली. दरम्यान, गोपीचंद पडळकर यांच्या टीकेवर शरद पवार गटाच्या मेहबूब शेख यांच्याकडून पलटवार करण्यात आलाय. ‘मंत्रिपद मिळालं नाही म्हणून गोपीचंद पडळकर यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, मी लई शिव्या देतो म्हणून मंत्रीपदाचा तुकडा टाकतील असं वाटलं. राम शिंदे यांना सभापती केलं म्हणून यांच्या डोक्यावर परिणाम झाला’, पुढे मेहबूब शेख असेही म्हणाले, भाजपने तुम्हाला भुकायला ठेवलं आहे, मीच कसा जयंत पाटलांवर बोलू शकतो. हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. तुझा राजकीय प्रवास, तुझ्यासारख्या माणसानं जयंत पाटील यांचा कार्यक्रम करणं म्हणजे हसू येण्यासारखं आहे, असा एकेरी उल्लेख करत मेहबूब शेख यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर निशाणा साधलाय.

Published on: Feb 09, 2025 12:30 PM