बेमुदत साखळी उपोषणानंतर एमआयएमचा कँडल मार्च

| Updated on: Mar 10, 2023 | 7:12 AM

औरंगाबाद नामांतर विरोधी कृती समितीतर्फे कँडल मार्च काढण्यात आला. या कँडल मार्चला हजारो नागरिकांनी प्रतिसाद दिला. यात महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

Follow us on

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव धारशिवच्या नामांतराच्या निर्णयाला केंद्र आणि राज्य सरकराने परवानगी दिली. त्याला एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी विरोध केला आहे. तसेच सध्या त्यांच्याकडून बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे. याच्यापुढे जात औरंगाबाद नामांतर विरोधी कृती समितीतर्फे कँडल मार्च काढण्यात आला. या कँडल मार्चला हजारो नागरिकांनी प्रतिसाद दिला. यात महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. आंदोलनात सहभागी झालेले कोणत्या जातीचे किंवा धर्माचे नसून ते नामांतर विरोधी लोक आहेत, असे मत खासदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केले. गेल्या सहा दिवसांपासून साखळी आंदोलन केल्यानंतर गुरुवारी सायंकाळी कँडल मार्च काढत आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालय ते भडकल गेट या मार्गावर हा मोर्चा काढण्यात आला.