Sanjay Shirsat : मंत्री संजय शिरसाटांच्या घरावर हल्ला; मध्यरात्री दगडफेक
शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांच्या घरावर मध्यरात्रीच्या सुमारास हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे.
दत्ता कनवटे, प्रतिनिधी.
मंत्री संजय शिरसाट यांच्या घरावर मध्यरात्रीच्या सुमारास हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे. मध्यरात्री दीडच्या सुमारास एका तरुणाकडून हा हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे. हल्ला करणाऱ्या तरुणाचा फोटो देखील आता समोर आला आहे.
रात्री दीड वाजेच्यासुमारास मंत्री संजय शिरसाट यांच्या संभाजीनगर येथील घरावर हल्ल्याचा प्रयत्न झालेला आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका तरुणाने दगडफेक करत शिवीगाळ केली. यावेळी तरुणाने आरडाओरड करून चांगलाच गोंधळ घातलेला बघायला मिळाला. या तरुणाला सुरुवातीला रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र तरीही या तरूनकडून दगडफेक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर या तरुणावर सातारा पोलीस ठाण्यात मंत्री संजय शिरसाट यांच्या घरावर हल्ला केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे.
