Jalgaon News : पहिले बळजबरी विकलं, नंतर पाच महिन्यांचा गर्भपात केला.. अल्पवयीन मुलीचे हाल पाहून बापाने जे केलं ते..
Jalgaon Crimen News : अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने विकल्यानंतर तिचा गर्भपात करण्यात आल्याची धक्कादायक घटना जळगावमध्ये घडली आहे.
अल्पवयीन मुलीला विकून तिचं जबरदस्ती लग्न लावण्यात आलं, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. जळगावात राहणाऱ्या या मुलीला रोजगाराच्या बहाण्याने शहरात नेलं. त्यानंतर अडीच लाख आणि दागिने घेऊन या मुलीला महिलांनी नाशिकमध्ये विकलं, अशी माहिती नातेवाईकांकडून मिळाली आहे. दरम्यान, धक्कादायक बाब म्हणजे या संपूर्ण प्रकारानंतर अल्पवयीन पीडितेच्या वडिलांनी आत्महत्या केली आहे. हे मोठं रॅकेट असून या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी नातेवाईक करत आहेत.
जळगावमध्ये 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला विकून तिचे जबरदस्ती लग्न लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलीला विकून तिचे लग्न लावून दिल्यानंतर ती पाच महिन्यांची गर्भवती राहिल्याचाही गंभीर प्रकार समोर आला आहे. मुलीसोबत घडलेल्या या प्रकारानंतर न्याय मिळावा म्हणून पोलीस तक्रार देऊनही कोणतीही कारवाई न झाल्याने या अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे जळगावात खळबळ उडाली आहे.
