VIDEO : मनसे नेते Amit Thackeray यांना पुत्ररत्न
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे हे आजोबा- आजी झाले आहेत. राज ठाकरे यांच्या सूनबाई आणि अमित ठाकरे यांच्या पत्नी मिताली ठाकरे यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला आहे. आज दुपारी राज ठाकरे यांच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. त्यामुळे शिवतिर्थावर सध्या आनंदाचं वातावरण आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे हे आजोबा- आजी झाले आहेत. राज ठाकरे यांच्या सूनबाई आणि अमित ठाकरे यांच्या पत्नी मिताली ठाकरे यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला आहे. आज दुपारी राज ठाकरे यांच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. त्यामुळे शिवतिर्थावर सध्या आनंदाचं वातावरण आहे. दरम्यान, मिताली ठाकरे आणि बाळ सुखरूप असल्याचं सूत्रांनी सांगितलं. राज यांच्या घरी एप्रिल महिन्यात नवीन पाहुणा येणार असल्याचं सांगितलं जात होतं. त्यामुळे ठाकरे कुटुंबात आनंदाचं वातावरण होतं. अमित आणि मिताली यांचा साखरपुडा 11 डिसेंबर 2017 रोजी झाला होता, तर जवळपास वर्षभराने म्हणजे 27 जानेवारी 2019 रोजी ते विवाहबंधनात अडकले होते.
