Suresh Dhas News : सुरेश कुटेच्या बायकोकडे आलिशान गाड्या; सुरेश धस यांच्याकडून ज्ञानराधाच्या मालकाचा पर्दाफाश

Suresh Dhas News : सुरेश कुटेच्या बायकोकडे आलिशान गाड्या; सुरेश धस यांच्याकडून ज्ञानराधाच्या मालकाचा पर्दाफाश

| Updated on: Mar 06, 2025 | 5:36 PM

Dnyanradha Multistate Scam : मराठवाड्यातल्या लोकांची कोट्यवधी रुपयांची फसणवणूक करणाऱ्या ज्ञानराधाच्या सुरेश कुटेची बायको ही आलिशान गाड्यांमधून फिरायची असं सांगत कुटेच्या घोटाळ्यांचा पर्दाफाश आमदार सुरेश धस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केला आहे.

ज्ञानराधा घोटाळ्यामुळे आत्तापर्यंत मारठवड्यातल्या 26 लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. ज्ञानराधाच्या सुरेश कुटेच्या बायकोच्या सुरक्षेसाठी पुढे तीन गाड्या आणि मागे तीन गाड्या असतात. आलिशान गाड्यांमध्ये हे लोक फिरत होते, असं म्हणत आमदार सुरेश धस यांनी ज्ञानराधाच्या सुरेश कुटे याच्या घोटाळ्यांचा पर्दाफाश केला आहे.

पुढे बोलताना धस म्हणाले की, काहीही असल्यास याची नोंदणी आमची नाही केंद्राची आहे असं म्हंटलं जात. मात्र राज्य सरकारच्या सहकार आयुक्ताकडून एनओसी गेल्याशिवाय केंद्रातून परवानगी कशी मिळेल? असा प्रश्न धस यांनी उपस्थित केला. मराठवाड्यात कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली आहे. परिस्थिती भयंकर आहे. याबद्दल मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा करून आरोपींच्या जप्त केलेल्या मालमत्तेतून सभासदांना त्यांचे पैसे परत करण्यासाठी पाऊल उचलवं असंही धस यांनी म्हंटलं आहे.

Published on: Mar 06, 2025 05:36 PM