Devendra Fadnavis | ‘मोदींचं सरकार म्हणजे माझं सरकार,जनतेमध्ये विश्वास

| Updated on: May 24, 2022 | 3:17 PM

भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यसमिती बैठकीत माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे बोलत होते.

Follow us on

भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यसमिती बैठकीत माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे बोलत होते.
भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रविजी, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, केंद्रीय मंत्री डॉ भागवत कराड, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, आशीष शेलार, गिरीश महाजन आणि अन्य नेते, पदाधिकारी उपस्थित होते. माझे कुटुंब, माझी जबाबदारी नाही, तर
प्रत्येक व्यक्तीला आपले मानत त्यांनी सुशासनाचा आदर्श उभा केला.आज जगातील अनेक देश महागाईने त्रस्त असताना त्यावर उपाययोजना करणारा भारत हा देश आहे. पेट्रोल-डिझेलचे दर कमी करताना राज्याच्या वाट्याला धक्का लावला नाही, तर केंद्राच्या हिश्य्यातून 2.20 लाख कोटी रुपयांचा भार घेतला. आंतरराष्ट्रीय पातळीवर संकट असताना हा निर्णय मा. नरेंद्र मोदीजी यांनी घेतला, तो केवळ सामान्य माणसाला दिलासा देण्यासाठी. आता इंधनावर केंद्र सरकारचे कर आहेत 19 रुपये आणि राज्य सरकारचा कर आहे 30 रुपये.
आता सांगा इंधन दरवाढ कुणामुळे.आपल्याला उत्सव नाही, तर संवाद करायचा आहे. नरेंद्र मोदीजी सरकारच्या योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचविण्यासाठी लाभार्थी संवाद मेळावे करायचे आहेत.भारत आज जगाच्या मुख्य प्रवाहात आहे.
हे यश आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या कुशल नेतृत्वाचे आहे. असं यावेळी देवेद्रं फडणवीस म्हणाले.