Ghatkopar : मी मराठी बोलणारच नाही..; घाटकोपरच्या परप्रांतीय महिलेचा व्हिडीओ व्हायरल
मुंबईत पुन्हा एकदा मराठी विरुद्ध हिंदी वाद पेटला आहे. घाटकोपर पूर्व येथे एका परप्रांतीय महिलेचा व्हिडीओ व्हायरल
मुंबईत पुन्हा एकदा मराठी विरुद्ध हिंदी वाद पेटला आहे. घाटकोपर पूर्व येथे एका परप्रांतीय महिलेने मराठीत बोलण्यास नकार देत स्थानिक मराठी ग्राहकांना हिंदीत बोलण्यास सांगितल्याने वाद निर्माण झाला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
घाटकोपर पूर्वेतील मदन केटरर्सच्या बाजूच्या एका दुकानाबाहेर काही ग्राहक उभे होते. या दुकानातील बिहारमधील एका महिलेने त्यांना हटकले. यावेळी ग्राहकांनी तिला मराठीत बोलण्यास सांगितले, परंतु तिने स्पष्ट नकार दिला आणि हिंदीतच बोलण्याचा आग्रह धरला. ती म्हणाली, आम्ही हिंदुस्तानात राहतो, हिंदीत बोला. तिने मराठीऐवजी हिंदीत बोलण्याचा दमही दिला. या वादाचे अनेकांनी मोबाईल कॅमेऱ्यात कैद केले असून, हा व्हिडीओ आता व्यापकपणे पसरला आहे, ज्यामुळे मराठी-हिंदी भाषिक तणाव पुन्हा चर्चेत आला आहे.
Published on: Jul 21, 2025 12:36 PM
