आज ‘या’ मार्गावर असणार मेगाब्लॉक

| Updated on: Dec 14, 2025 | 11:06 AM

मुंबईतील तिन्ही रेल्वे मार्गांवर, विशेषतः पश्चिम आणि ट्रान्स-हार्बर मार्गांवर, आज देखभाल-दुरुस्तीसाठी मेगाब्लॉक आहे. बोरीवली ते गोरेगाव आणि ठाणे ते वाशी/नेरुळ दरम्यानच्या सेवांवर परिणाम झाला आहे. अनेक लोकल रद्द झाल्या असून काही उशिराने धावतील. रेल्वे प्रशासनाने नागरिकांना आवश्यक असल्यासच प्रवास करण्याचे आवाहन केले आहे.

मुंबईच्या तिन्ही रेल्वे मार्गांवर आज, विकेंडच्या दिवशी, देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेवर बोरीवली ते गोरेगाव दरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गांवर सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक असेल. या वेळेत धिम्या लोकल जलद मार्गावरून धावतील. काही लोकल सेवा रद्द करण्यात आल्या असून, काही १५ ते २० मिनिटे उशिराने धावणार आहेत. बोरीवली स्थानकावरील फलाट क्रमांक एक ते चार पूर्णपणे बंद राहतील.

त्याचबरोबर, ट्रान्स-हार्बर मार्गावर ठाणे आणि वाशी-नेरुळ दरम्यानच्या सर्व लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत किंवा उशिराने धावतील. सिग्नल यंत्रणा आणि रेल्वे रुळांच्या देखभालीसाठी हा मेगाब्लॉक आवश्यक आहे. विकेंडच्या दिवशी असलेल्या या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. रेल्वे प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, काम असल्यासच घराबाहेर पडावे, अन्यथा प्रवासाचे नियोजन टाळावे.

Published on: Dec 14, 2025 11:06 AM