Mumbai Metro : वर्ष अखेरपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत आणखी एक मेट्रो येणार

Mumbai Metro : वर्ष अखेरपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत आणखी एक मेट्रो येणार

| Updated on: Apr 16, 2025 | 4:08 PM

Mumbai Metro - 2B Trial Run : भारतीय रेल्वेच्या १७२व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आजपासून मुंबई मेट्रो - 2 बीच्या मार्गावर आजपासून चाचणीला सुरुवात झालेली आहे.

मुंबई मेट्रो – 2 बीच्या मार्गावर आजपासून चाचणीला सुरुवात झालेली आहे. मुंबईकरांच्या सेवेत लवकरच ही मेट्रो धावणार आहे. चेंबुर – मानखुर्द मेट्रोची ट्रायल रन आजपासून सुरू झाली आहे. मुंबई मेट्रो – 2 बी मार्गावर ही चाचणी होत आहे. भारतीय रेल्वेच्या १७२व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आजपासून हे ट्रायल रन सुरू करण्यात आले आहे. या चाचणीनंतर डायमंड गार्डन (चेंबूर) ते मंडाले (मानखुर्द) या ५.४ किलोमीटर लांबीच्या मार्गावर लवकरच मेट्रो धावणार आहे. तसेच चेंबूर येथे मोनोरेलसोबत मेट्रो जोडली जाणार आहे. या चाचणीनंतर सुरक्षा प्रमाणपत्र जारी केल्यावर हा मार्ग सुरू होणार आहे.

Published on: Apr 16, 2025 04:08 PM