Maharashtra Rain : राज्यभरात कोसळधार… पाऊस वाढल्यानं उद्या शाळा-कॉलेज बंद, ‘या’ जिल्ह्यात सुट्टी, मुंबईला 48 तास रेड अलर्ट

Maharashtra Rain : राज्यभरात कोसळधार… पाऊस वाढल्यानं उद्या शाळा-कॉलेज बंद, ‘या’ जिल्ह्यात सुट्टी, मुंबईला 48 तास रेड अलर्ट

| Updated on: Aug 18, 2025 | 8:31 PM

राज्यभरातील मुसळधार पावसामुळे जनजीवन आणि वाहतूक विस्कळीत झाली आहे. सध्याच्या पावसाच्या स्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उद्या शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबईमधील शाळा आणि महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. मुंबई आणि परिसरामध्ये रेड अलर्ट असल्यामुळे मुंबई आणि परिसरातल्या शाळा उद्या बंद राहणार असल्याची मोठी माहिती समोर येत आहे. मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई आणि पनवेल महापालिका यासह पनवेल पालिका विभाग या ठिकाणी उद्या शाळा आणि महाविद्यालय बंद असणार आहे. मुसळधार पावसामुळे पाणी साचलं असल्याने तसेच हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने उद्या शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

दरम्यान, मुंबईसह उपनगरामध्ये पावसाची संततधार कायम असल्याने पुढचे 12 तास तुफान पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. तर मुंबईला 48 तासांसाठी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पावसाचा फटका मध्य आणि हर्बर मार्गावरील रेल्वेच्या वाहतुकीला बसला असून 20 मिनिटांनी लोकल सेवा उशिराने सुरू आहेत. तर राज्यभरात कोसळणाऱ्या पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी खबरदारीच्या सूचना देखील दिल्या आहेत.

Published on: Aug 18, 2025 08:31 PM