Mumbai Weather Report | मुंबईकरांची कोंडी! पारा घसरला तरी खराब हवेची चिंता कायम
मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून तापमानात चढउतार जाणवत असून नागरिकांना उन्हाळ्याचा तडाखा अनुभवायला मिळत आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांमध्ये तापमान 35 अंश सेल्सिअसच्या खाली राहिले असून, दादर चौपाटी परिसरात सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. समुद्रकिनाऱ्यावर वारा असला तरी दुपारच्या 12 ते 4 या वेळेत उन्हाचा तडाखा जाणवत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

हवामान खात्यानुसार, किमान तापमान सध्या 32 अंश सेल्सिअसच्या आसपास राहिले आहे, तर गुरुवारपासून तापमान पुन्हा वाढेल अशी शक्यता आहे. तापमान वाढत असताना शहरातील हवेची गुणवत्ता गेल्या 20 दिवसांपासून अत्यंत खराब श्रेणीत आहे, त्यामुळे नागरिकांना विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे. हवामान खात्याच्या सल्ल्यानुसार ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि ज्यांना श्वसनाचे त्रास आहेत अशा नागरिकांनी बाहेर जाणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे आणि गरमीपासून बचावासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी.