Mumbai Rain : आधी स्पार्क मग मोठा आवाज अन् नंतर उडाला भडका, रेल्वे ट्रॅकवरचा डीपीच जळाला, बघा VIDEO
आज आठवड्याचा पहिलाच दिवस असून मुंबईतील पावसाने मुंबईकरांची मोठी दाणादाण उडवून दिली आहे. मध्य रेल्वे मार्गावरील सीएसएमटी रेल्वे स्थानक ते भायखळा रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रूळावर पाणी साचल्याने मध्य रेल्वे ठप्प झाली होती आता तासभर उशिराने वाहतूक सुरू आहे.
मुंबई आणि मुंबई उपनगर परिसरात पहाटेपासूनच जोरदार पावसाने मुंबईकरांना चांगलंच झोडपून काढलं. तर दुसरीकडे मुंबईची लाईफ लाईन म्हणून ओळखली जाणारी मुंबईची लोकल सेवा मुंबईच्या पहिल्याच पावसात ठप्प झाल्याचे आज पाहायला मिळाले. मध्य रेल्वे मार्गावरील सीएसएमटी रेल्वे स्थानक ते भायखळा रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रूळावर पाणी साचल्याने ट्रेन ठप्प होती. यादरम्यान, स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. तर दुसरीकडे वेस्टर्न रेल्वे मार्गावरही या मुसळधार पावसाचा काहिसा फटका बसल्याचे पाहायला मिळाले. मरिन लाईन्स ते चर्चगेट स्थानकादरम्यान डीपी जळाल्याची घटना आजच घडली आहे. मरिन लाईन्स ते चर्चगेट स्थानकादरम्यान डीपी जळाल्याची दृश्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मरिन लाईन्स ते चर्चगेट स्थानकादरम्यान डीपीमध्ये सुरूवातीला स्पार्क उडाला मग मोठा आवाज झाला अन् नंतर आगीचा भडका उडाल्याचे पाहायला मिळालं.
