नागपुरात शिक्षकांचं विविध मागण्यासाठी आंदोलन
नागपुरातील यशवंत स्टेडियमवर शिक्षकांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. शालार्थ आयडी घोटाळ्यामुळे ६३२ शिक्षकांचे वेतन थकले आहे. आंदोलक आक्रमक झाले असून, पोलीस आणि त्यांच्यात झटापट झाली. दोन ते तीन आंदोलनकर्त्यांची प्रकृती खालावली आहे. वेतन त्वरित मिळावे ही त्यांची प्रमुख मागणी आहे.
नागपूरमध्ये शिक्षकांचे विविध मागण्यांसाठी यशवंत स्टेडियमवर आंदोलन सुरू आहे. शालार्थ आयडी घोटाळ्याच्या आरोपामुळे अनेक शिक्षकांचे वेतन थकवण्यात आले आहे, ज्यामुळे शिक्षक आक्रमक झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ६३२ शिक्षकांचे वेतन थांबले असल्याने हे आंदोलन पुकारण्यात आले आहे.
या आंदोलनादरम्यान काही आंदोलनकर्त्यांची प्रकृती खालावल्याचे समोर आले आहे. तसेच, पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाल्याचे दृश्यही दिसले. शिक्षक लोटांगण घालत आपला निषेध व्यक्त करत आहेत. पोलिसांनी काही शिक्षकांची धरपकडही केली आहे. थकित वेतन त्वरित मिळावे ही आंदोलकांची मुख्य मागणी आहे.
Published on: Dec 14, 2025 01:41 PM
