इगतपुरीत तासभर गारपीट, फळभाज्याचं मोठं नुकसान; टीव्ही 9 शी बोलताना शेतकऱ्यांना अश्रू अनावर

| Updated on: Apr 16, 2023 | 3:23 PM

Igatpuri Unseasonal Rain : नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातही काल अवकाळी पाऊस पडला. शिवाय गारपीटही झाली. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शैलेश पुरोहित यांनी...

Follow us on

इगतपुरी, नाशिक : मागच्या काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस कोसळतोय. या पावसामुळे शेतीचं नुकसान होतंय. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातही काल अवकाळी पाऊस पडला. शिवाय गारपीटही झाली. काल सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास इगतपुरीत एक तास तुफान गारपीट झाली. या गारपिटीत शेतकऱ्यांच्या शेतीचे अतोनात नुकसान झाले असून टमाटे, काकडी, मिरची, वांगे, कोबी इत्यादी प्रकारच्या पिकांचे नुकसान झालं. या गारपीटीमुळे पिकं आडवी झाली आहेत. यावेळी टीव्ही 9 शी बोलताना शेतकरी तुकाराम शिंदे यांना आपले अश्रू अनावर झाले.