हनुमानासारखी माझी छाती फाडून दाखवली तर…; विखे पाटलांवर अब्दुल सत्तार यांची प्रतिक्रीया
भाजप नेते, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं नावही आघाडीवर आहे. याबाबत शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांना विचारले असता त्यांनी हनुमानाचे उदाहरण दिलं आहे.
छत्रपती संभाजीनगर : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विरोधी पक्ष नेते अजित पवार हे आहेत. त्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून सासुरवाडी, पुणे, मुंबई ते थेट नागपुरमध्ये पोस्टर्स लागले आहे. इतकेच काय तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे देखील तसे पोस्टर्स लागले आहेत. तर त्यांच्या पाठोपाठ भाजप नेते, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं नावही आघाडीवर आहे. याबाबत शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांना विचारले असता त्यांनी हनुमानाचे उदाहरण दिलं आहे. तसेच विखे पाटील मुख्यमंत्री काय त्यापेक्षा मोठे नेते व्हावेत अशी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी सत्तार यांनी, हनुमानासारखी माझी छाती फाडून दाखवली तर त्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटीलच दिसतील. तर त्यांना अडचण होईल असे मी बोलणार नाही. मला तसे प्रश्नही विचारू नका, असेही ते म्हणाले.
