कार्यकारी अध्यक्षपदी निवड होताच सुप्रिया सुळे यांनी टि्वट केलं; म्हणाल्या…

| Updated on: Jun 10, 2023 | 3:17 PM

शरद पवारांनी पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्या नावाची घोषणा केली. प्रफुल्ल पटेलांकडे मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, झारखंड, गोवा राज्यांची जबाबदारी दिलीय. सुप्रिया सुळेंकडे महाराष्ट्र, हरियाणा, पंजाब, महिला युवक, युवती आणि लोकसभेची जबाबदारी देण्यात आलीय.

Follow us on

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या 25 व्या वर्धापन दिनाच्या दिवशी शरद पवार यांनी भाकरी फिरवलीच. शरद पवारांनी पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्या नावाची घोषणा केली. प्रफुल्ल पटेलांकडे मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, झारखंड, गोवा राज्यांची जबाबदारी दिलीय. सुप्रिया सुळेंकडे महाराष्ट्र, हरियाणा, पंजाब, महिला युवक, युवती आणि लोकसभेची जबाबदारी देण्यात आलीय. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी टि्वट करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात माझी व प्रफुलभाई पटेल यांची कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. याबद्दल पक्षसंघटनेची मी मनापासून आभारी आहे. पक्षाने माझ्यावर टाकलेला हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी कटिबद्ध असेन त्यांनी म्हटलं आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतक यांचे यापूर्वी उत्तम सहकार्य मिळाले आहे ते यापुढेही कायम राहिल हा विश्वास आहे. या जबाबदारी बद्दल आदरणीय पवार साहेब, पदाधिकारी, ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते आदी सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार मानते असते त्या म्हणाल्या आहेत.