Nitesh Rane : पगारी माणूस बोलला नाही तर बोनस मिळणार नाही; नितेश राणेंचा राऊतांना टोला

Nitesh Rane : पगारी माणूस बोलला नाही तर बोनस मिळणार नाही; नितेश राणेंचा राऊतांना टोला

| Updated on: Jun 29, 2025 | 5:41 PM

Nitesh Rane Slams Sanjay Raut : ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर होत असलेल्या भाष्यावरून आज मंत्री नितेश राणे यांनी टीका केली आहे.

संजय राऊत हा पगारी माणूस आहे. बोलला नाही तर त्याला बोनस मिळणार नाही अशी कुचकी टीका मंत्री नितेश राणे यांनी केली आहे. खासदार संजय राऊत यांच्याकडून सातत्याने ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर होत असलेल्या भाष्यावरून आज मंत्री नितेश राणे यांनी ही टीका केली आहे. सरकारकडून पहिलीपासून हिंदी भाषेच्या सक्तीचा जीआर काढण्यात आल्यानंतर विरोधक विशेषत: मनसे आणि शिवसेना ठाकरे गट आक्रमक झालेला आहे. त्याच अनुषंगाने ठाकरे बंधूंनी एल्गार पुकारला असून येत्या 5 जुलैला मोर्चा देखील काढण्यात येणार आहे. त्यावरून देखील राणेंनी टीका केली आहे. ठाकरे बंधूंना मोर्चा काढायचा आहे तर मोहम्मद अली रोड, बेहराम पाडा मधून काढून दाखवा, नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं. येत्या ५ जुलैला ठाकरे बंधू मोर्चा काढणार आहेत त्यावरून नितेश राणेंनी टीका केली.

Published on: Jun 29, 2025 05:40 PM