MNS : मिरा-भाईंदरमधील मोर्चाआधीच मनसेला मोठा धक्का…. तरीही अविनाश जाधव ठाम, म्हणाले…

MNS : मिरा-भाईंदरमधील मोर्चाआधीच मनसेला मोठा धक्का…. तरीही अविनाश जाधव ठाम, म्हणाले…

| Updated on: Jul 07, 2025 | 5:23 PM

सर्व राजकीय पक्ष सामाजिक संस्था महाराष्ट्र प्रेमी यांच्या वतीने मीरा-भाईंदर शहरातील मराठी अस्मितेसाठी मराठी माणसासाठी उद्या मीरा भाईंदरमध्ये मराठी मोर्चा काढण्यात येणार आहे

मिरा-भाईंदरमधील उद्या होणाऱ्या मराठी भाषेच्या एका मोर्चा आधीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अविनाश जाधवांना नोटीस बजावण्यात आली आहे. मोर्चासाठी मिरा-भाईंदरमध्ये येण्यास मनसेला पोलिसांकडून मज्जाव करण्यात आला आहे. मराठीला मानणारे तसेच मराठी माणसाने उद्याच्या मराठी मोर्चाला सामील व्हावं, असं आवाहन अविनाश जाधव यांनी केलंय. तर मोर्चाला मोर्चानंच उत्तर देणार असं म्हणत अविनाश जाधव उद्याच्या मोर्चावर ठाम असल्याचे पाहायला मिळत आहे.

‘मिरा-भाईंदरमध्ये मराठी माणसाची किती ताकद आहे. हे दाखवून ज्याने मिरा-भाईंदरमध्ये मनसेविरोधात मोर्चा काढला त्याला त्याची ताकद दाखवण्याची वेळ आलीये. पत्रकार परिषद सुरू असताना मला पोलिसांकडून नोटीस आली. नोटीस देऊन आम्हाला फरक पडत नाही. ज्यावेळी आमच्या भाषेवर येतं. त्यावेळी नोटीशीला घाबरणारे माणसं आम्ही नाही.’, असं अविनाश जाधव म्हणाले.

Published on: Jul 07, 2025 05:23 PM