Laxman Hake : सरकारने आता या झुंडशाहीला बळी पडू नये, लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना टोला
Laxman Hake slams Manoj Jarange : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका केली आहे.
मनोज जरांगे यांचा बालहट्ट आहे. मात्र सरकारने आता या झुंडशाहीला बळी पडू नये, असं ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी म्हंटलं आहे. तसंच मनोज जरांगे यांना शरद पवारांची फूस आहे, असंही आरोप हाके यांनी केला आहे.
मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा एल्गार पुकारत मराठा समाजाला मुंबईकडे मोर्चा घेऊन जाण्याची आणि आंदोलनाची घोषणा केलेली आहे. त्यासंदर्भात आज अंतरवाली सराटीमध्ये बैठक देखील पार पडली. यावेळी 29 ऑगस्टला मुंबईत धडकण्याची घोषणा त्यांनी केली आहे. त्यावर लक्ष्मण हाके यांनी टीका केली आहे. मनोज जरांगे यांचं कातडी बचाओ आंदोलन असणार आहे. त्यांचा बालहट्ट आहे. मात्र आता सरकारने कोणत्याही झुंडशाहीला बळीपडू नये असं हाके यांनी म्हंटलं आहे.
Published on: Jun 29, 2025 06:01 PM
