संजय राऊतांमुळेच उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचण्यास अडथळे- दीपक केसरकर

संजय राऊतांमुळेच उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचण्यास अडथळे- दीपक केसरकर

| Edited By: | Updated on: Jul 13, 2022 | 2:51 PM

शिवसेनेनं राज्यपालांना दिलेल्या पत्रावरून घमासान झालं आहे. शिवसेनेनं राज्यपालांना पत्र लिहिणं म्हणजे रडीचा डाव अशी टीका दीपक केसरकर यांनी केली आहे.

शिवसेनेनं राज्यपालांना दिलेल्या पत्रावरून घमासान झालं आहे. शिवसेनेनं राज्यपालांना पत्र लिहिणं म्हणजे रडीचा डाव अशी टीका दीपक केसरकर यांनी केली आहे. संजय राऊतांमुळेच उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचण्यात अडचणी आल्या, असंदेखील केसरकर म्हणाले. “याला रडीचा खेळ म्हणतात. हा रडीचा खेळ शिकवणारा कोणी असेल तर शिवसेनेच्या नेत्यांनी आणि पक्षप्रमुखांनी त्यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे”, अशी प्रतिक्रिया केसरकरांनी दिली. राऊत यांनीदेखील केसरकर यांच्यावर पलटवार केला. रडीचा डाव असेल तर तुम्ही कोर्टात का गेलात असा सवाल राऊतांनी केला.