‘लोकशाहीला काळीमा फासण्याचा प्रकार सुरू’ : अनिल देसाई

| Updated on: Jan 10, 2023 | 7:37 PM

सुनावणीनंतर शिंदे गटाने हा संपूर्ण युक्तीवाद राज्याच्या विधानसभेत आणि लोकसभेत निवडून आलेले सदस्य म्हणजे बहुमताचा आकडा ज्याच्याकडे सर्वात जास्त आहे, त्या बाजूने निर्णय घेण्यात यावा, असा आग्रह केंद्रीय निवडणूक आयोगाकडे करण्यात आला

Follow us on

नवी दिल्ली : शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या चिन्हावर आज केंद्रीय निवडणूक आयोगात महत्त्वाची सुनावणी पार पडतेय. या सुनावणीवेळी दोन्ही गटाकडून जोरदार युक्तीवाद सुरू आहे. यावेळी उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेवर आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गटावर शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी लक्ष केले. त्यावरून आता शिवसेनेचे सचिव, खासदार अनिल देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी या सुनावणीवेळी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना पक्षप्रमुख पदावर राहण्याचा अधिकार नाही, असा युक्तीवाद केला. तर शिवसेनेची जुनी घटना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे केंद्रीत होती. पण नंतर ती न बदलता उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख असे नाव स्वतःसाठी घेतले असेही जेठमलानी यांनी म्हटले.

या सुनावणीनंतर शिंदे गटाने हा संपूर्ण युक्तीवाद राज्याच्या विधानसभेत आणि लोकसभेत निवडून आलेले सदस्य म्हणजे बहुमताचा आकडा ज्याच्याकडे सर्वात जास्त आहे, त्या बाजूने निर्णय घेण्यात यावा, असा आग्रह केंद्रीय निवडणूक आयोगाकडे करण्यात आला.

यावर बोलताना, देसाई यांनी, अशी मागणी करणे हे पूर्णत: लोकशाहीला घातक आहे. परंतु आम्हाला न्यायदेवतेवर आणि केंद्रीय निवडणूक आयोगावर पूर्ण विश्वास आहे, असे म्हटलं आहे.