Pune | तुम्हीही काही धुतल्या तांदळासारखे नाहीत, नाईकांना सुनावले; वादात पुण्यातील बड्या नेत्याची उडी

| Updated on: Jan 27, 2026 | 2:20 PM

सत्तेत एकत्र काम करत असून मित्र पक्ष आहात तरी एकमेकांवर टीका करणं चुकीचं आहे. गणेश नाईक जर एक बोट शिंदेंकडे दाखवत असतील तर चार बोट आपल्याकडे आहेत, याचं नाईकांनी भान ठेवावं, असा सल्ला रवींद्र धंगेकर यांनी दिला आहे. आपण धुतल्या तांदळासारखे असल्याचं गणेश नाईकांना वाटत असेल तर ते चुकीचं आहे, असंही धंगेकर म्हणाले.

नवी मुंबई महापालिका निवडणुकीत आणि निवडणुकीच्या निकालानंतरही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे नेते तसेच राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्यात तू तू मै मै सुरूच आहे. दोन्ही नेते एकमेकांना इशारे देत आहेत. एकमेकांना संपवण्याची भाषा करताना दिसत आहेत. गणेश नाईक यांनी तर भाजपने परवानगी दिली तर शिंदे गटाचं नामोनिशाणच ठाणे जिल्ह्यातून मिटवून टाकू, अशी भाषा केली आहे. त्यामुळे हा वाद आणखीनच चिघळताना दिसत आहे. त्यातच भाजप आणि शिंदे गटाचे नेतेही त्यावर प्रतिक्रिया देऊन आगीत तेल ओतताना दिसत आहेत. आता शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी या वादात उडी घेतली आहे. सत्तेत एकत्र काम करत असून मित्र पक्ष आहात तरी एकमेकांवर टीका करणं चुकीचं आहे. गणेश नाईक जर एक बोट शिंदेंकडे दाखवत असतील तर चार बोट आपल्याकडे आहेत, याचं नाईकांनी भान ठेवावं, असा सल्ला रवींद्र धंगेकर यांनी दिला आहे. आपण धुतल्या तांदळासारखे असल्याचं गणेश नाईकांना वाटत असेल तर ते चुकीचं आहे, असंही धंगेकर म्हणाले. सातत्याने एकनाथ शिंदेचा अपमान नाईक करतात यावर भाजपच्या नेत्यांनी नाईकांना समज द्यावी, अशी मागणीही धंगेकर यांनी केली आहे.

Published on: Jan 27, 2026 02:20 PM