शिंदे गटाच्या खासदाराचा अजित पवार यांच्या पलवार, म्हणाला, ‘दादा तुमच्या अजून चौकशा सुरू आहेत, त्यामुळं’
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या कामकाजावर टीका करताना सरकारमध्ये भ्रष्टाचार भोकाळलेला आहे. इथं कुठंही वजन ठेवल्याशिवाय काही गोष्टी घडत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाल्याची टीका केली हेती.
बुलढाणा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यावरून विरोधी पक्षांनी टीका केली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या कामकाजावर टीका करताना सरकारमध्ये भ्रष्टाचार भोकाळलेला आहे. इथं कुठंही वजन ठेवल्याशिवाय काही गोष्टी घडत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाल्याची टीका केली हेती. त्यावरून आता शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांनी पलटावार केला आहे. तसेच अजित पवार यांनी असे आरोप करणे म्हणजे हास्यास्पद असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. तर अजित पवार यांच्याविरोधात ईडीच्या आणि अनेक आर्थिक चौकशा चालू आहेत. त्यामुळे जनतेला माहित आहे की भ्रष्टाचारी कोण आहे. त्यामुळे अजित दादांनी असे आरोप करणे चुकीचं असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.
Published on: Jun 06, 2023 11:41 AM
