Pulwama Attack : पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली
Pulwama attack Pakistan confession : पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याची खळबळजनक कबुली आता खुद्द पाकिस्ताननेच दिलेली आहे.
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याची कबुली आता खुद्द पाकिस्ताननेच दिलेली आहे. यासंदर्भातली कबुली पाकिस्तानच्या एका अधिकाऱ्याने दिलेली आहे. आम्ही आमच्या रणनीतीचं कौशल्य दाखवल्याची कबुली पाकिस्तानी हवाई दलाचा अधिकारी सय्यद औरंगजेब याने दिली आहे. एका पत्रकार परिषदेत त्याने ही कबुली दिली.
यावेळी हा अधिकारी म्हणाला की, जर पाकिस्तानच्या जमीन, हवा, पाणी, लोकांना धोका निर्माण झाल्यास कोणतीही तडजोड करणार नाही. पुलवामा हल्ल्याच्यावेळी आम्ही आमच्या रणनीतीचं कौशल्य दाखवल, असंही या पाकिस्तानी अधिकाऱ्याने म्हंटलं आहे. तसंच पाकिस्तानी सैन्यावरील विश्वास आम्ही कोणत्याही परिस्थितीत जपतो. आता आम्ही आमची लष्करी प्रगती आणि धोरणात्मक कौशल्य दाखवू , असंही या पाक अधिकाऱ्याने म्हंटलं आहे.
Published on: May 11, 2025 05:57 PM
