PM Narendra Modi : उगवत्या सूर्याप्रमाणे हे समिटही चमकत आहे – पंतप्रधान नरेंद्र मोदी
WAVES 2025 Mumbai : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जिओ वर्ल्ड सेंटर येथे होणाऱ्या भारतातील पहिल्या जागतिक ऑडिओ – विज्यूअल आणि मनोरंजन शिखर परिषदेसाठी मुंबई दौऱ्यावर आहेत. आपल्या भाषणातून त्यांनी या समिटचे कौतुक केले आहे.
रशियात राज कपूर यांची लोकप्रियता, कानमध्ये सत्यजित रे यांची लोकप्रियेता आहे. ऑस्करमध्ये तेच दिसतं. गुरुदत्त यांची सिनेमॅटिक पोएट्री असो किंवा ऋत्विक घटक यांचं सोशल रिफ्लेक्शन असो. ए. आर. रहमान यांचं संगीत असो की राजामौलींची महागाथा असो प्रत्येक कहाणी भारतीय संस्कृतीचा आवाज बनून जगाच्या मनात बसली आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हंटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जिओ वर्ल्ड सेंटर येथे होणाऱ्या भारतातील पहिल्या जागतिक ऑडिओ – विज्यूअल आणि मनोरंजन शिखर परिषदेसाठी (वेव्हज २०२५) मुंबई दौऱ्यावर आहेत. न्यूज 9 ने WAVES Edition ग्लोबल समिटचं आयोजन केलं आहे. जिओ कनव्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित या शिखर परिषदेत ते बोलत होते.
पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आपण भारतीय सिनेमाच्या अनेक दिग्गजांना टपाल तिकिटाच्या माध्यमातून स्मरणात ठेवलं आहे. गेल्या काळात मी गेमिंग वर्ल्ड, फिल्ममेकर, अभिनेते, संगीतकारांना भेटलो. त्यांच्याशी चर्चा केली. त्यात भारताची क्रिएटिव्हिटी आणि ग्लोबल कॉलोबोशनची चर्चा व्हायची. मी तुमच्याकडून आयडिया घ्यायचो. मलाही या विषयात खोलवर जाण्याची संधी मिळायची. मी एक प्रयोग केली. काही वर्षापूर्वी मी गांधी जयंतीनिमित्ताने १५० देशातील गायक गायिकांना गांधींचं गीत गायला प्रेरित केलं. गांधींच्या १५०व्या जयंतीनिमित्ताने जगभरातील गायकांनी ते गायलं. याचा परिणाम म्हणजे जग एकसाथ आलं. भारत आणि क्रिएटीव्ह जग एकत्र येऊन काय कमाल करू शकतं हे यातून आपण दाखवून दिलं. आज त्याच काळातील कल्पना वास्तवात आली आहे. जसा नवीन सूर्य उगवल्यावर आकाशाला रंग देतो. तसंच ही समिट आपल्या पहिल्या पर्वापासूनच चमकत आहे.
