Corona Update | आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर देहूगाव व आळंदीत 7 दिवस संचारबंदी, सर्व प्रकारची वाहतूक बंद

| Updated on: Jun 27, 2021 | 9:40 AM

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर देहूगाव व आळंदी शहर आणि आसपासच्या परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 28 जून ते 04 जुलै पर्यंत संचारबंदी घोषित करण्यात आली आहे.

Follow us on

पुणे : संत तुकाराम महाराज व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर देहूगाव व आळंदी शहर आणि आसपासच्या परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 28 जून ते 04 जुलै पर्यंत संचारबंदी घोषित करण्यात आलीय. देहू आळंदी परिसरामध्ये आषाढी पायी वारी निमित्त मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येत असतात. त्यामुळे भाविक एकत्र येऊन गर्दी होण्याची व कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे पिंपरी चिंचवड पोलिसांनी हा संचारबंदीचा निर्णय घेतलाय (police impose Curfew in Dehu and Alandi amid Ashadhi Wari).