Maharashtra Rain : राज्यासाठी पुढील 5 दिवस चितेंचे… कुठे अतिमुसळधार पावसाचा अंदाज? कोणत्या जिल्ह्याला हवामान खात्याचा अलर्ट?

Maharashtra Rain : राज्यासाठी पुढील 5 दिवस चितेंचे… कुठे अतिमुसळधार पावसाचा अंदाज? कोणत्या जिल्ह्याला हवामान खात्याचा अलर्ट?

| Updated on: Aug 13, 2025 | 3:34 PM

राज्याच्या बहुतांश भागात पावसाचा जोर वाढणार असल्याचे दिसून येते, विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात सतर्क राहणे आवश्यक आहे, अशी माहिती पुणे हवामान विभागचे हवामान शास्त्रज्ञ एस. डी.सानप यांनी दिली.

राज्याच्या विविध भागांत मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला असून, विदर्भ आणि मराठवाड्यात विशेषतः जोरदार पावसाची शक्यता आहे. मान्सूनच्या वाऱ्याची तीव्रता अधिक वाढल्याने विदर्भात पुढील 5 दिवस अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. तर येणाऱ्या तीन दिवस कोकण, गोव्यासह मध्य महाराष्ट्राला हवामान खात्याकडून मान्सूचा येलो अलर्ट जारी केला आहे तर मराठवाड्याकरता हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यासह विदर्भाला देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला असल्याची माहिती पुणे हवामान विभागचे हवामान शास्त्रज्ञ एस. डी.सानप यांनी दिली आहे. महाराष्ट्रात येत्या काही दिवसात नेमकी पावसाची स्थिती कशी असणार? राज्यातील कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट जारी करण्यात आलाय? बघा व्हिडीओ…

Published on: Aug 13, 2025 03:34 PM