शरद पवार-उद्धव ठाकरे यांच्या भेटीत नेमकं काय घडलं?; सुप्रिया सुळे म्हणाल्या…

शरद पवार-उद्धव ठाकरे यांच्या भेटीत नेमकं काय घडलं?; सुप्रिया सुळे म्हणाल्या…

| Edited By: | Updated on: Apr 12, 2023 | 12:44 PM

Sharad Pawar Uddhav Thackeray Meeting : पवार-ठाकरे भेटीत नेमकी कशावर चर्चा; सुप्रिया सुळे यांनी दोन महत्वाचे मुद्दे सांगितले. पाहा व्हीडिओ...

पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये काल संध्याकाळी बैठक झाली. या बैठकीची महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली. या बैठकीत नेमके कोणते मुद्दे चर्चिले गेले? यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “शरद पवार आणि उद्धव ठाकरे भेटीबद्दल मला जास्त माहिती नाही. पण या भेटीत बाळासाहेबांच्या आठवणींवर चर्चा झाली. ताडोबा जंगलातील वाढलेल्या वाघाबाबत या भेटीत चर्चा झाली”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. जेपीसी चौकशीबाबतची आमची भूमिका आजची नाही तर आधीपासूनची आहे. संसदेतही आम्ही तीच भूमिका मांडली आहे, असंही सुप्रिया सिळे म्हणाल्या आहेत.

Published on: Apr 12, 2023 12:44 PM