VIDEO : Raj Thackeray Ayodhya Visit | अयोध्या दौऱ्यासाठी मनसेची पुण्यात नावनोंदणीला सुरूवात
अयोध्या दौऱ्याला जाण्यापूर्वी पदाधिकाऱ्यांच्या सोबत संवाद साधण्यासाठी तसेच अयोध्या दौऱ्यात सहभागी होण्यासाठी कार्यकर्त्याच्या नाव नोंदणी मोहिमेचा उदघाटन समारंभासाठी राज ठाकरे पुण्यात येणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याची जोरदार तयारी पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांच्याकडून करण्यात आली आहे अयोध्येच्या दौऱ्यापूर्वी राज ठाकरे हे पुण्यात सभा घेण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पुणे दौरा आजपासून सुरु होत आहे. तसेच अयोध्या दौऱ्यासाठी मनसेने पुण्यात नावनोंदणीला सुरूवात केली आहे. मात्र पदाधिकाऱ्यांच्या बैठका नेमक्या कधी होणार याबाबत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे पदाधिकाऱ्यांसोबत आज व उद्या बैठका होणार आहेत हे कळू शकलेले नाही . अयोध्या दौऱ्याला जाण्यापूर्वी पदाधिकाऱ्यांच्या सोबत संवाद साधण्यासाठी तसेच अयोध्या दौऱ्यात सहभागी होण्यासाठी कार्यकर्त्याच्या नाव नोंदणी मोहिमेचा उदघाटन समारंभासाठी राज ठाकरे पुण्यात येणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याची जोरदार तयारी पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांच्याकडून करण्यात आली आहे अयोध्येच्या दौऱ्यापूर्वी राज ठाकरे हे पुण्यात सभा घेण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.यासाठी पोलीस प्रशासनाकडे परवानगीही मागण्यात आली आहे.
Published on: May 17, 2022 12:06 PM
