काँग्रेसने स्वाभिमान गहाण टाकलाय
राज्यात ज्यावेळी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले त्यावेळी काँग्रेसचे आमदारांनी महाविकास आघाडीला अर्थप्राप्तीसाठ फक्त मदत केली असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
राज्याच्या राजकारणात काँग्रेस पक्षाने आपला स्वाभिमान गहाण टाकला असल्याची टीका भाजपचे आमदार राधाकृष्ण विके पाटील यांनी केली. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांवर टीका करताना सांगितले की, महाविकास आघाडीचे सरकार असताना काँग्रेसच्या नेत्यांना नगण्य स्थान होते, तर राज्यात त्यांचा उल्लेखही नव्हता अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस पक्षावर केली आहे. राज्यात ज्यावेळी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले त्यावेळी काँग्रेसचे आमदारांनी महाविकास आघाडीला अर्थप्राप्तीसाठ फक्त मदत केली असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
