Raj Thackeray : पदाधिकाऱ्यांची युतीची मागणी; राज ठाकरेंच्या महत्वाच्या सूचना

Raj Thackeray : पदाधिकाऱ्यांची युतीची मागणी; राज ठाकरेंच्या महत्वाच्या सूचना

| Updated on: Jun 06, 2025 | 1:55 PM

Raj Thackeray latest news : राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीबाबत महत्वाच्या सूचना केल्या आहेत.

ठाकरेंसोबतच्या युतीबाबत कोणतंही वक्तव्य नको, अशा सूचना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज पदाधिकाऱ्यांना केल्या आहेत. राज ठाकरेंच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीतच त्यांनी ठाकरेंसोबतच्या युतीबाबत कोणतेही वक्तव्य नको, असा सूचना दिल्या असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्याच्या गप्पा राजकीय वर्तुळात रंगल्या आहे. याबद्दल उद्धव ठाकरेंच्या नेत्यांकडून आम्ही सकारात्मक असल्याचं सांगितलं आहे. मात्र राज ठाकरेंच्या नेत्यानी यावर काही ठोस प्रतिक्रिया अद्याप दिलेळी नाही. आजच्या बैठकीत मसे पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंना युती करण्याबद्दल मागणी केली आहे. त्यावर राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. या पूर्वी देखील राज ठाकरेंनी पत्र लिहीत पदाधिकारी कार्यकर्त्यांना ठाकरेंसोबतच्या युटीवर बोलणं टाळण्याचं आवाहन केलं होतं.

Published on: Jun 06, 2025 01:55 PM