Rajya Sabha Election : मोठी बातमी! राज्यसभेच्या 6 जागांसाठी निवडणूक जाहीर, 10 जूनला मतदान

| Updated on: May 12, 2022 | 4:50 PM

राज्यसभेच्या 6 जागांपैकी पाच जागांवर भाजप आणि महाविकास आघाडीचे खासदार निवडून जातील. तर सहावी जागा रिक्त राहणार आहे. या जागेवर संभाजीराजे छत्रपती अपक्ष लढणार आहेत.

Follow us on

मुंबई : महाराष्ट्रातील 6 राज्यसभा सदस्यांचा (RajyaSabha MP) कार्यकाळ संपुष्टात येत असल्यानं त्या जागांवरील निवडणूक आता जाहीर झाली आहे. यानिवडणुकीसाठी 31 मे पर्यंतही अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. तर 10 जून रोजी मतदान पार पडेल. राज्यसभेच्या 6 जागांपैकी पाच जागांवर भाजप आणि महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) खासदार निवडून जातील. तर सहावी जागा रिक्त राहणार आहे. या जागेवर संभाजीराजे छत्रपती (SambhajiRaje Chatrapati) अपक्ष लढणार आहेत. तशी घोषणाच त्यांनी आज केली आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर राजकीय पक्षांच्या संख्याबळात बदल झालाय. त्यामुळे राज्यसभेच्या जागांसाठी आता संख्येचं गणित बदलल्याचं पाहायला मिळत आहे.