वाळू डेपोवरून विखे पाटील यांचा महसुल अधिकाऱ्यांना थेट इशारा; म्हणाले, ‘…अन्यथा कारवाई’

वाळू डेपोवरून विखे पाटील यांचा महसुल अधिकाऱ्यांना थेट इशारा; म्हणाले, ‘…अन्यथा कारवाई’

| Updated on: Jun 22, 2023 | 8:18 AM

राज्यातील वाळूचे लिलाव बंद करून डेपो योजना सुरू केली जाणार होती. तसे आदेश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले होते. मात्र याबाबत अजूनही म्हणावी त्यापद्धतीने कार्यवाही झालेली नाही.

संगमनेर/अहमदनगर : राज्य शासनाच्या माध्यमातून जनतेच्या हिताचा मोठा निर्णय घेण्यात आला होता. त्यात राज्यातील वाळूचे लिलाव बंद करून डेपो योजना सुरू केली जाणार होती. तसे आदेश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले होते. मात्र याबाबत अजूनही म्हणावी त्यापद्धतीने कार्यवाही झालेली नाही. त्यावरून महसूलमंत्री विखे पाटील यांनी आता थेट महसूल अधिकाऱ्यांना दम देत थेट इशाराच दिला आहे. त्यांनी एका महिन्यात सगळीकडे वाळू डेपो सुरू करा अन्यथा कारवाईला सामोर जा असं म्हटलं आहे. तसेच आमच्या काही अधिकाऱ्यांमध्ये निष्काळजीपणा दिसतोय. वेगेवगळी कारण मुद्दाम सांगितली जातायत. यापूर्वी हफ्ते घेताना कोणी आडव येत नव्हतं का? महिनाभरात नुसते डेपो सुरू नव्हे तर पूर्ण क्षमतेने चालवा आणि जर अस झालं नाही तर कडक कारवाई केली जाणार असा इशाराच महसूलमंत्री विखे यांनी महसुलच्या अधिकाऱ्यांना दिलाय. संगमनेर तालुक्यातील आश्वी येथे वाळू डेपो उदघाटन प्रसंगी बोलताना विखे पाटील यांनी वक्तव्य केलय.

Published on: Jun 22, 2023 08:18 AM