Sanjay Raut : पाणी बंद केलं, यूट्यूब चॅनल बंद केले; याला बदला म्हणायचं का? संजय राऊतांचा उपरोधक प्रश्न
Sanjay Raut Press Conference : शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेतून पहलगाम हल्ल्यावरून भाजप सरकारवर निशाणा साधला.
पहलगाम येथे हल्ला झाल्यावर पाहिल्या 24 तासात पाकिस्तानला धडा शिकवायला पाहिजे होता. जगभरात याच पद्धतीने बदला घेतला जातो. आम्ही पाणी बंद केलं, असा टोला उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज भाजपवर लगावला आहे. पहलगाम हल्ल्याविषयी आम्हाला राजकारण करायचं नाही, ही आमची भूमिका आहे. पण भारतीय जनता पक्षाच्याच काही संस्था, संघटना याविषयी राजकरण करत असल्याचा आरोपही यावेळी संजय राऊत यांनी केला आहे.
पुढे सिंधु जल करार स्थगितीवर बोलताना राऊत म्हणाले की, पाणी बंद केलं असं सांगितलं. पण पाणी असंच बंद होत नाही. त्यासाठी मोठे बंधारे बंधावे लागतील. धरणं बंधावे लागतील. त्यानंतर 20 वर्षांनी हे धरणं बांधून झाल्यावर पाणी बंद करता येईल. पाकिस्तानचे 27 यूट्यूब चॅनल भाजप सरकारने बंद केले. याला बदला म्हणतात का? असा बदला असतो का? असा उपरोधक सवाल देखील यावेळी राऊत यांनी उपस्थित केला.
