Sanjay Raut : सिंहासन खाली करा, ठाकरे येत आहेत.. ; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया

Sanjay Raut : सिंहासन खाली करा, ठाकरे येत आहेत.. ; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया

| Updated on: Jul 05, 2025 | 3:19 PM

Sanjay Raut Reaction On Thackeray Brothers Melava : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यानंतर खासदार संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.

आता पुढे जे बसले आहेत महाराष्ट्राचे शत्रू सत्तेत. त्यांनी आवराआवर केली पाहिजे. सिंहासन खाली करो, ठाकरे आए है ही घोषणा आम्ही देणार आहोत. राणे वगैरे कसले विरोधक आहेत. मोदी आणि शहा यांनी हवा भरलेले फुगे आहेत. कोण शिंदे , कोण राणे. हे मोदी शाह हवा भरतात म्हणून फुगले. टाचणी मारली तर फुटून जातील, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे. ठाकरे बंधूंच्या एकत्र मेळाव्यानंतर राऊत यांनी ही पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, सूत्रधार वगैरे काही नसतं. आम्ही राजकारणात आहोत. समाजकारणात आहोत. पक्षात आहोत. कुटुंबासोबत आहोत. आम्ही ठाकरेंसोबत आहोत जन्मत:च. कुठे काही मिठाचा खडा पडला असेल तर तो काढण्यासाठी आमचा प्रयत्न कामी पडत असेल तर आम्ही तो प्रयत्न केला. सुदैवाने दोन्ही ठाकऱ्यांशी मी त्याच प्रेमाने बोलू शकतो. बोलत राहिलो. त्यातून आजचं चित्र उभं राहिलं. ठाकरे एकत्र येतील याची मला 100 टक्के खात्री आहे. तसं नसतं तर हा सोहळा पार पडला नसता. पहिल्या रांगेतही ठाकरे आहे. दोन्ही कुटुंब बसले होते. मी राखणदार आहे. मागे बसलो, असं संजय राऊत म्हणाले.

Published on: Jul 05, 2025 03:19 PM