‘संजय राऊत 20-20 प्लेअर आहेत, फक्त चौका…,’ काय म्हणाले जावेद अख्तर

‘संजय राऊत 20-20 प्लेअर आहेत, फक्त चौका…,’ काय म्हणाले जावेद अख्तर

| Updated on: May 17, 2025 | 9:25 PM

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकाचे प्रकाशन आज मुंबईत झाले. यावेळी अनेक दिग्गज राजकारणी, आणि समाजातील मान्यवर मंडळी उपस्थित होती.

खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचे प्रकाशन आज थाटामाटात झाले. यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेना नेते उद्धव ठाकरे आणि गीतकार जावेद अख्तर यांचे भाषण झाले. जावेद अख्तर आपल्या भाषणात म्हणाले की संजय राऊत हे टी २० चे खेळाडू आहेत. ते चौकार आणि षटकारच मारतात. ते घाबरतही नाही. पण ते चेंडू स्टेडियम बाहेरच टोलवत असतात.माझा त्यांच्याशी कसा परिचय झाला आणि चांगले संबंध झाले ते सांगतो. प्रत्येक लोकशाहीत प्रत्येक पक्षाची गरज असते. निवडणुकीची गरज असते. झालीस तर ईमानदार मीडियाचीही गरज असते. त्याच प्रकारे असे नागरिकही असावेत की जे कोणत्याच पक्षाचे नसावे. त्यांना जे चांगलं वाटलं ते बोलावं. जे वाईट वाटतं ते बोलावं. मी त्यापैकी एकच आहे. तुम्ही एकतर्फी बोलला तर एकाच पद्धतीच्या लोकांना खूश कराल. तुम्ही अधिक बोलला तर सर्व लोकांना खूश करणार असेही जावेद अख्तर यावेळी म्हणाले.

Published on: May 17, 2025 09:24 PM