Sanjay Raut : असे वाद महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा आहे; राणे बंधूंच्या वादावर राऊतांची प्रतिक्रिया

Sanjay Raut : असे वाद महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा आहे; राणे बंधूंच्या वादावर राऊतांची प्रतिक्रिया

| Updated on: Jun 09, 2025 | 12:18 PM

Sanjay Raut on Rane brothers : निलेश आणि नितेश राणे यांच्यात पडलेल्या वादाच्या ठिणगीवर आज खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भावाभावात वाद होऊ नये, घर कोणाचंही असुद्या. राजकारणामुळे घरात वाद निर्माण होऊ नये, अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. मंत्री नितेश राणे यांच्या विधानानंतर राणे बंधूंमध्ये वादाची ठिणगी पडल्याचं बघायला मिळालं आहे. त्यावर आज राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी राणे बंधूंसारखा तोल सोडून बोलणारा माणूस नाही, अशी टीका देखील यावेळी राऊतांनी केली आहे.

यावेळी पुढे बोलताना राऊत म्हणाले की, राजकारणामुळे घरात वाद होऊ नये. हा वैचारिक वाद असू शकेल. एक भाऊ एका पक्षाचे आमदार आहेत, तर दुसरे भाऊ दुसऱ्या पक्षाचे आमदार आहेत. कदाचित हा वैचारिक वाद असेल. त्यांची आई आणि वडील दोघेही हे वाद सोडवायला सक्षम आहेत. ते एकाच घरात राहतात, वैचारिक वाद सहज सुटू शकतात. असे वाद ही महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा आहे.

Published on: Jun 09, 2025 12:11 PM