Sanjay Raut : पंतप्रधान 2025 चा काळ पूर्ण करतील का यावर मला शंका, राऊतांची टीका

Sanjay Raut : पंतप्रधान 2025 चा काळ पूर्ण करतील का यावर मला शंका, राऊतांची टीका

| Updated on: Apr 07, 2025 | 1:27 PM

Sanjay Raut On Donald Trump : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी वक्फ बोर्डवरून बोलताना आज पुन्हा एकदा भाजप सरकारला निशाणा बनवलं आहे.

जशी अमेरिका विकली जाते आहे, तसंच आपला देश विकला जातोय. हा देश मोदी आणि अमित शहा यांच्या लाडक्या उद्योगपतींना विकला जाण्यासाठी वक्फ बोर्ड विधेयक ही महत्वाची पायरी आहे, अशी टीका उबठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हंटलं आहे. आज पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी पुन्हा एकदा वक्फ विधेयकावरून सरकारवर निशाणा साधला आहे.

पुढे बोलताना राऊत म्हणाले की, धारावीपासून वक्फ बोर्डापर्यंत एलोन मस्कला ज्या पद्धतीने अमेरिका विकली जातेय, तेच आपल्याकडे देखील आहे. जसा तिकडे एलोन मस्क तसा आपल्याकडे दोन ते चार उद्योगपती देश चालवतात. आपल्याकडे देखील उद्योगपतींच्या सोयीने धोरणं बदलली जातात. अमेरिकेच्या 50 राज्यात ज्याप्रमाणे जनता उतरली त्यानंतर ट्रम्पच्या व्हाईट हाऊसमध्ये घुसून त्याला फटकवलं तरी आश्चर्य वाटणार नाही. आपल्या देशातही असंच होणार आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी 2025 चा काळ पूर्ण करतील का यावर मला शंका वाटते असंही संजय राऊत म्हणाले.

Published on: Apr 07, 2025 01:27 PM