शाहरुखच्या बंगल्याचा रंजक इतिहास; ‘व्हिला व्हिएना’वरून असा बनला ‘मन्नत’
अभिनेता शाहरुख खानच्या 'मन्नत' या बंगल्याचा इतिहास खूपच रंजक आहे. हा बंगला 1800 च्या उत्तरार्धात हिमाचल प्रदेशातील मंडीचे राजा बिजई सेन यांनी त्यांच्या एका राणीसाठी बांधला होता. नंतर शाहरुखकडे त्याची मालकी कशी आली, ते जाणून घेऊयात..
बॉलिवूडचा ‘किंग’ अर्थात अभिनेता शाहरुख खानचा ‘मन्नत’ बंगला हा चाहत्यांसाठी एखाद्या टूरिस्ट स्पॉटपेक्षा कमी नाही. वांद्र्यातील समुद्रकिनारी असलेल्या या बंगल्याबाहेर सतत चाहत्यांची गर्दी पहायला मिळते. मुंबई भ्रमंती करणाऱ्या पर्यटकांनाही हा बंगला आवर्जून दाखवला जातो. असा हा ‘मन्नत’ बंगला आधी ‘व्हिला व्हिएना’ या नावाने ओळखला जायचा. शाहरुखच्या या बंगल्याची आजची किंमत तब्बल 200 कोटींच्या घरात असल्याचं म्हटलं जातं. आता पुन्हा एकदा हा बंगला चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे त्यात आणखी दोन मजले वाढवण्यात येणार आहेत. त्यामुळे शाहरुख आणि त्याचे कुटुंबीय काही दिवसांकरिता दुसरीकडे स्थलांतरित झाले आहेत. ‘मन्नत’ या बंगल्याचा इतिहास काय आहे, शाहरुखने तो किती किंमतीला विकत घेतला होता, याबद्दल या व्हिडीओतून जाणून घेऊयात..
Published on: Mar 27, 2025 01:34 PM
