Sharad Pawar : वर्धापन दिनाच्या अधिवेशनातून शरद पवारांनी व्यक्त केली खंत

Sharad Pawar : वर्धापन दिनाच्या अधिवेशनातून शरद पवारांनी व्यक्त केली खंत

| Updated on: Jun 10, 2025 | 2:34 PM

पुण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अधिवेशनाच्या मंचावरून शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं.

पक्षात फूट पडेल असे आम्हाला कधीच वाटले नव्हते. पण ते घडले, पक्षात फूट पडली, असं राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष प्रमुख शरद पवार यांनी म्हंटलं आहे. आज शरद पवार गटाच्या पुण्यात पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अधिवेशनाच्या मंचावरुन बोलत होते.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, २६ वर्षांपूर्वी स्थापन झालेला त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटेल असे कधीच वाटले नव्हते. पण आव्हानांना न जुमानता ज्यांनी पक्ष पुढे नेला त्यांचं कौतुक वाटतं. पक्षाला काही आव्हानांचा सामना करावा लागला, पण तुम्ही निराश न होता पक्षाला पुढे नेत राहिलात. पक्षात फूट पडली. पक्षात फूट पडेल असे आम्हाला कधीच वाटले नव्हते, पण ते घडले. काही लोक दुसऱ्या विचारसरणीने गेले आणि ही फूट वाढली. मी आज याबद्दल बोलू इच्छित नाही. जे पक्षाशी एकनिष्ठ राहिले ते आमच्या पक्षाच्या विचारसरणीमुळे होते. त्यामुळे येत्या निवडणुकीत वेगळे चित्र समोर येईल, असा विश्वास यावेळी पवारांनी व्यक्त केला आहे.

Published on: Jun 10, 2025 02:34 PM