केसरकर लायकीपेक्षा जास्त बोलू नका

केसरकर लायकीपेक्षा जास्त बोलू नका

| Updated on: Jul 13, 2022 | 8:28 PM

या वादामुळे भाजप आणि शिंदे गटाकडे आता साऱ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे. कारण सध्या शिंदे गट हा भाजपसोबत असल्याने आणि राणे पिता-पुत्र सगळेच भाजप पक्षात असल्याने या वादाचा शेवट काय होणार याकडेच साऱ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे.

दीपक केसरकर इज्जत मिळते तर ती घ्यायला शिका, लायकीपेक्षा जास्त बोलू नका असं ट्विट करून आता शिवसेनेचे बंडखोर आमदार दीपक केसरकर आणि निलेश राणे यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. निलेश राणे आणि दीपक केसरकर यांचा वाद नवा नाही मात्र शिंदे गट आणि भाजप आता एकत्र येत असतानाही हा वाद उफाळून आल्याने कोकणातील राजकारण ढवळून निघालं आहे. त्यामुळे आता केसरकर-राणे हा वाद पुन्हा रंगण्याची चिन्हं दिसत असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या या वादामुळे भाजप आणि शिंदे गटाकडे आता साऱ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे. कारण सध्या शिंदे गट हा भाजपसोबत असल्याने आणि राणे पिता-पुत्र सगळेच भाजप पक्षात असल्याने या वादाचा शेवट काय होणार याकडेच साऱ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे.

Published on: Jul 13, 2022 08:28 PM