Satish Bhosale Case : खोक्याच्या अडचणी वाढणार? आणखी 2 गुन्हे दाखल

Satish Bhosale Case : खोक्याच्या अडचणी वाढणार? आणखी 2 गुन्हे दाखल

| Updated on: Mar 12, 2025 | 5:33 PM

Beed Crime News : सुरेश धस यांचा कार्यकर्ता आणि शिरूरच्या मारहाण प्रकरणात आरोपी असलेला सतीश भोसले यांच्यावर आणखी 2 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

सतीश भोसले उर्फ खोक्याच्या विरोधात आता आणखी दोन गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. सुरेश धस यांचा जवळचा कार्यकर्ता असलेला सतीश भोसले हा बीडच्या शिरूर मधल्या मारहाण प्रकरणातला आरोपी आहे. त्याचे काही व्हिडिओ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आपल्या सोशल मिडियावर शेअर केले. त्यानंतर पोलिसांकडून त्याचा शोध सुरू झाला. अखेर आज खोक्या भोसले याला उत्तर प्रदेशच्या प्रयागराज मधून बीड पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर आता खोक्यावर आणखी 2 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. सतीशच्या घरात शिकारीसाथी लागणाऱ्या वस्तु आणि  प्राण्यांच मास आढळल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर शिरूर कासार परिसरात त्याच्यावर गेल्या 20 दिवसात हे 3 गुन्हे दाखल झाले आहेत. अतिक्रमण प्रकरणात मालकी हक्कचा दावा करण्याची सुद्धा मागणी आता केली जात आहे.

Published on: Mar 12, 2025 05:33 PM