‘मोदींना पवार यांच्या बाजूला कसे…, ‘ काय म्हणाले संजय राऊत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना खुर्ची ओढून बसायला दिली त्यावरुन आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे.
अखिल भारतीय संमेलनाच्या आधी दिल्लीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्यात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राजकारण मतभेद आणि मतभिन्नता असतेच परंतू सलोखा कायम राहीला पाहीजे असे सांगत आजच्या राजकारणावर आसूड ओढले होते. त्यानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवार यांना खुर्ची ओढून दिली त्यांना ग्लासात पाणी भरुन दिले या प्रकारावर शिवसेनेचे संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. संजय राऊत म्हणाले मला वाटलं मोदी पवारांच्या बाजूला बसणार नाहीत. भटकती आत्म्याच्या बाजूला ते कसे काय बसू शकतील? पीएमओनी त्यांना परवानगी कशी काय दिली ? यात मराठीत एक म्हण आहे देखल्या देवा दंडवत अशी टीका राऊत यांनी केली. पवार यांचा पक्ष कोणी फोडला. त्यांच्या कुटुंबात फूट कोणी पाडली असा सवाल राऊत यांनी केला आहे.
