Sanjay Shirsat Video : ‘गरज पडल्यास आम्ही कुठेही उडी…’, उद्धव ठाकरेंच्या बाजूने संजय शिरसाट यांची बॅटिंग?

Sanjay Shirsat Video : ‘गरज पडल्यास आम्ही कुठेही उडी…’, उद्धव ठाकरेंच्या बाजूने संजय शिरसाट यांची बॅटिंग?

| Updated on: Feb 02, 2025 | 11:39 AM

दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास कुणाची हरकत असेल? त्यावेळी भाजपला सरळ करण्यासाठी गेलेले ठाकरे चक्रव्यूहात अडकले असावेत. अशी मोठी विधाने शिंदेंचे मंत्री संजय शिरसाट यांनी केलेत. त्यानंतर मात्र स्वतः शिरसाटांनी ही शक्यता फेटाळली.

भाजपाला सरळ करण्यात उद्धव ठाकरे चक्रव्यूहात अडकले आहेत. ठाकरे-शिंदे एकत्र आले तर कुणाला हरकत असणार? गरज पडल्यास आम्ही कुठेही उडी मारण्यास तयार! वेळ आली तर ठाकरे-शिंदेनी एकत्र येण्यासाठी प्रयत्न करणार आहे. हे विधानं आहेत शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांची आहेत. आपल्या विधानांनी खळबळ माजवल्यानंतर मात्र संजय शिरसाट यांनी आपली भूमिका बदलली. मात्र तोपर्यंत महायुतीच्या गोटात मोठ्या चर्चाही झाडल्याचे पाहायला मिळाले. ठाकरे गटाच्या नेत्यांनी यावरून मात्र भाजपकडून शिंदे साईडलाईन होत असल्यामुळे त्यांचे नेते पुन्हा मूळ शिवसेनेशी जवळीक दाखवू लागत असल्याचे दावे केले. दरम्यान, महायुतीत मुख्यमंत्रीपदानंतर मंत्री त्यानंतर खाते आणि पालकमंत्र्यांवरून मतभेद समोर आले. तेव्हापासून दबावतंत्र अवलंबलं जात असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. तुर्तास संजय शिरसाटांनी आपल्या विधानाच्या विपर्यासाचं स्पष्टीकरण दिलं असलं तरी गरज पडल्यास आम्ही कुठेही उडी मारण्यास तयार या संजय शिरसाटांच्या विधानाची सर्वाधिक चर्चा झाली. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Feb 02, 2025 11:36 AM